(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील चाँदसुर्या येथे कार दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. याप्रकरणी कारचालकाविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. अपघातातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आह़े. अथर्व दत्ताराम गांगण (20, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आह़े. तर या अपघातात दुचाकीवरील विष्णु माईंगडे (33) हा गंभीर जखमी असून राजेश लिंगायत (22, दोन्ही रा. भोके, रत्नागिरी) किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अथर्व गांगण आपल्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कार (एमएच-46-एबी- 4849) घेउन भरधाव वेगाने हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता. त्याचवेळी विष्णु माईंगडे आणि राजेश लिंगायत हे आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हावरून (एमएच 08 एके-1894) रत्नागिरी ते हातखंबा असे जात होते. ही दोन्ही वाहने चाँदसुर्या येथे आली असता अथर्वचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केला. या अपघातात विष्णू व राजेश हे देघेही जखमी झाल़े याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विनोद भितळे पुढील तपास करत आहेत़.