(रत्नागिरी)
पुणे, मुंबई सारख्या मोठं मोठ्या शहरात होणाऱ्या घटना आता रत्नागिरीतही वाढत आहेत. एका रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडल़ी.
शहरातील साळवी स्टॉप येथे प्रशांत प्रकाश बंडबे (33) हे 26 मार्च 2023 रोजी साळवी स्टॉप येथील चिरायु रूग्णालयासमोरील रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सेवा बजावत होत़े. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रमेश खेत्री हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच 08 एक्यू 5968) घेवून साळवी स्टॉप येथे आल़ा. यावेळी रिक्षामध्ये नरेंद्र बाबुराव बिरादार (33, ऱा किर्तीनगर रत्नागिरी) व विक्रांत श्रीधर शिंदे (31, ऱा कारवांचीवाडी रत्नागिरी) हे बसलेले होत़े. साळवी स्टॉप येथे प्रशांत बंडबे यांना पाहताच रमेश यांनी प्रशांत यांना शिवीगाळ करत ‘तू मागे माझ्या भावाच्या रिक्षाचे सीटचा मोबाईलवर फोटो का काढलास’ अशी विचारणा केल़ी. तसेच प्रशांत यांना ढकलाबुकली व शिवीगाळ करत ‘तुम्ही लोकांचे वाटोळे करताय, मी सीटी पोलीस स्टेशनच्या गायकवाड पोलिसाला मारहाण केली होत़ी. तुमच्या तंगड्या तोडून टाकीन, तुम्हाला ड्रेसवर नोकरी करायला देणार नाही’ अशी धमकी रमेश याने दिल्याची तक्रार प्रशांत बंडबे यांनी शहर पोलिसांत दाखल केल़ी.
त्यानुसार शहर पोलिसांनी रिक्षाचालक रमेश खेत्री याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भादंवि कलम 353,504,506 नुसार गुन्हा दाखल केल़ा आहे.