(क्रीडा)
महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता उद्या २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ १७.४ षटकांत ११० धावांवर गारद झाला.
यूपीच्या ११ फलंदाजांपैकी फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. मुंबईकडून इस्सी वोंग व्यतिरिक्त सायका इशाकने दोन बळी घेतले. नताली सीव्हर, हेली मॅथ्यूज आणि जय कलिता यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला. तर पी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने दोन बळी घेतले. अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
इस्सी वोंगने महिला प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला. युपी वॉरियर्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात तिने हॅटट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारी ती या स्पर्धेतील पहिली गोलंदाज ठरली आहे. वोंगने १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. नवागिरे नताली सिव्हर ब्रंटच्या हाती झेलबाद झाली. ती बाद झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर इस्सी वोंगने सिमरन शेखला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर वोंगने सोफी एक्लेस्टोनला क्लीन बोल्ड करून हॅट्ट्रिक पूर्ण केली.
घेतले.