(मुंबई)
चोक्सीने फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारे चोक्सी याला रेड नोटीसमधून वगळण्यात आले आहे..
पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार ५० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मेहुल चोक्सी याला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसच्या यादीतून काढून टाकले आहे. चोक्सीने याबाबत फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारे चोक्सी याला रेड नोटीसमधून वगळण्यात आले आहे. परंतु, नोटीस रद्द झाल्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्यावरील दाखल गुन्ह्यांचा तपास पुढच्या टण्यात पोहोचला आहे. त्यामुळे मेहूल चोक्सीवर अटतेची टांगती तलवार कायम असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
जानेवारी २०१८ मध्ये, मेहुल चोक्सी देशातून फरार झाल्याच्या सुमारे १० महिन्यांनंतर, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. देश सोडल्यानंतर चोक्सीने अँटिग्वा आणि बरबुडा या देशांचे नागरिकत्व स्वीकारले होते. मेहल चोक्सीविरोधात सीबीआयने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच याचिकेला चोक्सीने आव्हान दिले होते. त्यानंतर आता चोक्सी याला रेड कॉर्नर नोटीसमधून वगळण्यात आले आहे.