(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजिकच्या शिरगांव येथील घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पती – पत्नीने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम पवार आणि स्मिता पवार (दोन्ही मूळ रा.किणी वठार हातकणंगले, कोल्हापूर सध्या रा. रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती – पत्नीची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गजानन एकनाथ मयेकर ( ५५ , रा.शिरगांव पेट्रोल पंपाजवळ, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार,संशयित पती – पत्नीने मयेकर यांच्या पत्नीच्या खोलीमधील लोखंडी कपाटातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.