[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहानिमित्त व क्रांतीभूमीला वंदन करण्यासाठी भीम युवा पँथर या संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी येथून विशाल महारॅलीचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि. २० मार्च ) सकाळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विशाल महारॅलीला सुरुवात करण्यात आली.
पार्किंगची सुविधा
महाड शहर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पार्किंग व्यवस्थाही केली आहे. – मुंबईहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग गांधारी नाका येथे, रायगड नाते गावाकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग एसटी स्टँडजवळ केली आहे. – दापोली-रत्नागिरीकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग चांदे क्रीडांगण येथे केली आहे. – पोलादपूर, पुणे बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी माणिकराव जगताप मैदान, नवेनगर येथे केली आहे.- अतिरिक्त पार्किंग म्हणून नगरपालिका शाळा क्रमांक पाचचे मैदान व गाडीतळ या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. – अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे कार्यक्रमास आगमन झाल्यास हेलिपॅडसाठी राखीव जागा करण्यात आली आहे.