(रत्नागिरी / दादा जाधव)
राज्यभर जुन्या पेन्शन योजनेसाठी विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत, त्यात जिल्ह्यामधून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शेखर निकम यांनी प्रथम लेखी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार बाळ माने यांनी एन पी एस पेन्शनधारकांना भेट दिली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. विशेष म्हणजे यावेळी आंदोलन कार्यकर्त्यानासुद्धा भरभरून आले, कारण आत्तापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली नव्हती. चार शब्द आधाराचे ऐकल्यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळाला.
यापेक्षाही विशेष बाब म्हणजे माजी आमदार बाळ माने यांनी आपण सुद्धा पेन्शनधारक आहोत, असे म्हणत “जुनी पेन्शन एकच मिशन” ही टोपी आपल्या डोक्यावर चढवली. यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा दिला. थोड्या वेळाने मी जरी टोपी घातली असली तरी ती टोपी मला तुमच्यासाठी नाहीतर सध्याचे पुढारी, नेते इतरांना टोप्या घालण्यात व्यस्त असल्याचा असल्याची कोपरखळी त्यांनी मारली. यावेळी उपस्थितांमध्ये टाळ्यांच्या कडकडाटासह एकच हशा पिकला. त्यानंतर बाळ माने यांनी आपण आपल्या पेन्शन मधील एकही रुपया खर्च करणार नाही किंवा काढणार नाही जोपर्यंत माझ्या या आंदोलनकर्त्या बंधू-भगिनींना जुनी पेन्शन लागू होणार नाही यामुळे आंदोलनकर्त्यांच्या आत्मविश्वासामध्ये भर पडल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.
एकही प्रशासकीय अधिकारी स्वतःहून भेटीला आले नाही. कोणीही लोकप्रतिनिधी देखील प्रत्यक्ष भेटीला आले नाही, ही खंत आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. माजी आमदार बाळ माने ज्यावेळी आंदोलनकर्त्यांना भेटण्यास आले त्यावेळी बाणे नावाच्या एक शिक्षिका आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. सदरचे मनोगत ऐकल्यानंतर बाळ माने यांनी आपणास भारवून आल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले. यानंतर त्यांनी जुनी पेन्शन योजना खरेच का लागू करणे आवश्यक असल्याचे सांगितले
मी सध्या पेन्शनधारक आहे. पेन्शन नसती तर माझ्या सुद्धा अडचणी वाढल्या असत्या, त्यामुळे अनेक वर्ष सेवा केल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणे किंबहुना अपुरी पेन्शन देणे हे मला मान्य नाही असे बाळ माने यांनी ठामपणे म्हटले आहे.