(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील कोतवडे सापडलेल्या मृतदेहाबाबत उलट सुलट चर्चा रंगत असताना तो खून असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
कोतवडे येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहचां ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचण्यात आला होता. दिलीप रामचंद्र रामाणे (58, रा. कोतवडे, रत्नागिरी ) असे त्याचे नाव आहे.
हा घातपात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दृष्टीने तपास करत असताना दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
दिलीप रामाणे हे मोलमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. शुक्रवारी रात्री गावातील काही तरुण लावगणवाडी येथील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी तेथील स्मशनाभूमीजवळील बागेत त्यांना रामाणे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पाटलांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना कळवले. त्यानंतर रात्री 11 वा. ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेचा तपास करत असताना दोघांना पोलिसांनी संशयित म्हणुन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.