(मुंबई / किशोर गावडे)
भारतीय जनता पार्टी भांडुप विधानसभा व कोकण विकास आघाडी मुंबई, आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभ आणि “खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन उत्कर्ष नगर येथील यशवंत चांदजी सावंत विद्यालय येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी मिलिंद पारकर यांनी केले होते.
उत्कर्ष नगरात महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ३५०हून अधिक महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. “खेळ रंगला पैठणीच्या” या कार्यक्रमाला भांडुप मधील महिलांनी प्रचंड केली होती.
सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि चार तास कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार ठरला. सह्याद्री विद्यामंदिर येथे ८ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात सुप्रिया दळवी यांनी “सोन्याची नथ” मिळवली होती. व १२ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात पुन्हा समाजसेविका सुप्रिया दळवी यांनी “सोन्याची नथ” या कार्यक्रमातून मिळवली. चार दिवसात दोन “सोन्याची नथ” मिळवण्याचा मान सौ. सुप्रिया दळवी यांनी मिळवला. तर श्रुती संजय घोसाळकर यांना “मानाची पैठणी” मिळाली. इंदिरा तेवर यांना चांदीची फ्रेम डायमंड कुडी तर आरती मेजरी यांना दहा हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर व गणपती फ्रेंम डायमंड कुडी देण्यात आली. सृष्टी भाटकर यांना रुपये दहा हजारांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा वालावलकर यांनी केले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आव्हानात्मक स्पर्धा घेत आपल्या विनोदी बुद्धीने आलेल्या सर्व महिलांचे भाजपा कोकण विकास आघाडीने कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहीतूले, मुंबई कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, जिल्हाध्यक्ष अरुण सावंत. अँड. प्रिया लाड,भांडुप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष, महेश चेंदवणकर, नयना तावडे,तसेच भांडुप विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व पुरुष व महिला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी, अमर कोर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना परब, कॉसमॉस हायस्कूल मध्ये गेली 42 वर्ष काम करणाऱ्या माधुरी पाडावे, अँड.कल्पना वेंकटेश जोशी, डॉक्टर सिद्धी शिंदे, शिक्षिका रजनी नायर, यांचा आकर्षक ट्रॉफी देऊन शानदार सत्कार करण्यात आला.