( लांजा )
समाजातील उपवर मुला – मुलींच्या लग्नाचे प्रश्न जटील होत असल्याने लांजा तालुका बौध्दजन संघ यांच्यावतीने रविवार दि. १९ मार्च रोजी सकाळी ११ ते ३ वा. कुलकर्णी – काळे छात्रालय येथे पाचवा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लांजा तालुका बौध्दजन संघ यांच्या वतीने नियमित सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातात. समाजातील उपवर मुला – मुलींच्या लग्नांचा प्रश्न जटील होत आहे . तसेच लग्न जुळवून आण्यासाठी वेळ व पैसा मोठ्या वाया जात असल्याची बाब लक्षात घेवून संघाने गेली चार वर्षे वधूवर परिचय मेळावे घेवून हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या महामारीत परिचय मेळावा घेण्यात आला नव्हता.
यावर्षी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्याला समाजातील जास्तीत उपवर मुला – मुलीने सहभाग घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष संतोष पडवणकर, उपाध्यक्ष अशोक कदम, सरचिटणीस सुनिल कांबळे, सहचिटणीस विश्वास कांबळे, माजी अध्यक्ष सुधाकर कांबळे, माजी सरचिटणीस आनंद कांबळे, माजी उपाध्यक्ष संजय कांबळे, शिवाजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, अंकिता कांबळे आदींनी केले आहे.