(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील सडये, पिरंदवणे, वाडाजून ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री देवी सुंकाई देवस्थानचा कलशारोहण सोहळा शुक्रवार दि.17 व शनिवार दि.18 मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडत आहे. सडये, पिरंदवणे, वाडाजूनमधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री देवी सुंकाई देवस्थानचा ग्रामस्थांच्या, भाविकांच्या आणि दानशुरांच्या देणगीतून भव्य जिर्णोध्दार करण्यात आला आहे. सार्यांच्या अथक प्रयत्नातून श्री सुंकाई मंदिराची देखणी वास्तू उभी राहिली आहे. सुंकाई हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. ही देवी तांदळा स्वरूपात आहे. तीची विशिष्ठ अशी मुतीर्र् नाही. जलस्थानावर असल्याने ती सप्तमातृका अर्थात आसरा या प्रकारातील देवता असल्याचे अभ्यासक मानतात.
शुक्रवार दि.17 रोजी दुपारी 2 वा. कलशारोहण सोहळ्याला सुरूवात होणार आहे. सडयेतील अशोक कदम यांच्या निवासस्थानापासून कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत सडये-पिरंदवणे-वाडाजूनच्या ग्रामीण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4.30 वा.वे.मू. संदिप भावे यांच्या पौरोहित्याखाली राक्षोघ्न होम विधी करण्यात येणार आहे.
शनिवार दि.18 मार्च रोजी सकाळी 7 वा. मंदिराची प्रासाद वास्तू व कलश प्रतिष्ठा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 11 वा. कलशारोहण व सत्यनारायणाची महापूजा व आरतीचा कार्यक्रम होईल. दु.12 वा. श्री देवी सुंकाई मंदिर जीर्णोध्दार कामी विशेष योगदान देणार्या व्यक्तिप्रती कृतज्ञता सोहळा पार पडेल. दुपारी 1.20 वा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल.
रात्री ठिक 10 वा. श्री सोळजाई नमन मंडळ, कोल्हेवाडी यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होईल, या सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव सोमेश्वर सुंकाई आणि एण्डोवमेंट ट्रस्ट यांनी केले आहे.