(मुंबई)
एलटीटी- मडगाव- एलटीटी एक्स्प्रेस व सीएसएमटी- मडगाव- सीएसएमटी तेजस एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस (गाडी नं. ११०९९) आणि मडगाव- एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या १० जून आणि ३१ ऑक्टोबरला धावणार नाहीत. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस (गाडी नं. ११०९९) ११ जून ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दर शुक्रवारी व रविवारी तर मडगांव एलटीटी एक्स्प्रेस (गाडी नं. १११००) १२ जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीत दर शनिवार, सोमवारी मान्सूनच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस (गाडी नं. २२११९) ३१ ऑक्टोबरला धावणार नाही. सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस (गाडी नं. २२११९) मंगळवार, गुरुवार, शनिवारी १० जून ते २९ ऑक्टोबर या कालावधीत तर मडगांव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (गाडी नं. २२१२०) बुधवार, शुक्रवार, शनिवारी ११ जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीत मान्सूनच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे.