( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यामधील केळशी येथून देशी दारूचा अवैध साठा जप्त केल्याची घटना रविवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केळशी बाजारपेठेत संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास श्रावणी खोत या महिलेच्या ताब्यात असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये देशी दारूच्या 180 मिली मापाच्या सीलबंद 15 प्लास्टीकच्या बाटल्या आढळून आल्या. विनापरवाना अवैधरित्या दारूचा साठा जवळ बाळगल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.