( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यामधील जालगाव बाजारपेठ येथे राहणारी प्रतीक्षा कोवळे या 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक्षा ही आजाराने त्रस्त होती. सकाळी अचानक तिला दम्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. या त्रासामुळे तिला काहीही बोलता येत नसल्याने ती बेशुद्ध पडली. तिला तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ती मृत झाल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने दापोली पोलिस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.