रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे हे महसूल गाव म्हणून ओळखले जाते.गेल्या काही महिन्यांपासून हे गाव एसटी पासून वंचित का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. यासंदर्भात एस.टी. विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाच्या माहामारीमध्ये राज्य सरकारने एसटी सेवा बंद केली होती. ज्या वेळी एसटी सेवा चालू करण्यात आली त्यावेळेपासून आजपर्यंत सैतवडे गावात एसटी चे दर्शन झालेले नाही. या गावातील, परीसरातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी आपल्या कामासाठी जावयाचे असल्यास कुठल्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था नसल्याने लोकांनची फार मोठी अडचण निर्माण होते.
याचा विचार करून सैतवडे गावातील माजी पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम मुल्ला, पत्रकार जमीर खलफे यांनी रत्नागिरी येथे एसटी अधिकार्यांची भेट घेतली व सर्व माहिती सांगून त्यांना निवेदन देण्यात आले व असे ही सांगण्यात आले की लाॅकडॉनपूर्वी ज्या एसटी गाड्या चालु होत्या त्या गाड्या त्वरित चालू करून लोकांचा होणारा त्रास व गैरसोय दूर करावी अशी मागणी केली.