( चिपळूण)
कराडच्या व्हेट्स फॉर अॅनिमल्स या संस्थेने पुढाकार घेऊन गेल्या आठवडाभरात शहरातील १०० भटक्या कुत्र्यांची मोफत नसबंदी केली. तसेच लसीकरणही केले. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने त्यांना धन्यवाद दिले. नगर परिषदेकडून सातत्याने या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली जात आहे. मात्र तरीही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत तितकीशी घट झाली नाही.
त्यामुळे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते यांनी वरील संस्थेकडून काही महिन्यांपूर्वी ५०० कुत्र्यांची शस्त्रक्रिया करून घेतली होती. यासाठी सुमारे १० लाख रूपये इतका खर्च झाला आहे. त्यामुळे आपलेही प्रशासनाला सहकार्य व्हावे म्हणून या संस्थेने गेल्या आठवडाभर येथे १०० कुत्र्यांची मोफत नसबंदी केली. तसेच जास्त भुंकणाऱ्या कुत्र्यांचे लसीकरणही केले. यासाठी प्रशासनाने पवन तलाव मैदान येथे खास कक्ष तयार केला होता.