( लांजा / प्रतिनिधी )
तालुक्यातील तेलीवाडी येथे एका 52 वर्षीय वृध्देचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना 10 मार्च 2023 रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. संगीता बाळासाहेब कदम (52, लांजा, तेलीवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता यांना दम्याचा आजार होता. तिच्यावर स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यात आले होते. मात्र 10 मार्च रोजी त्यांची तब्येत सायंकाळी अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना 10 मार्च रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.