(मुंबई)
अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने १५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
दरम्यान ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रुपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार ही रक्कम सदानंद कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला. मात्र तरी सुद्धा १४ दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले होते.
सदानंद कदम यांना कोठडीत असताना औषध घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, घरचं जेवण देण्यास ईडीने विरोध केला आहे. सदानंद कदम यांचा डाएट प्लॅन सुरू असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच कदम यांना ब्लड प्रेशर असल्याची माहिती त्यांचे वकील निरंजन मुदरगी यांनी दिली आहे.