( प्रतिनिधी / रत्नागिरी )
तालुक्यातील सांडेलावगण वाकडवाडी येथे कारचालकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या दोघा आरोपिंना न्यायालयाने दोषी मानून शिक्षा सुनावल़ी. दोन्ही आरोपिंना न्यायालयाने 10 हजार रूपयांच्या चांगल्या वर्तवणूकीच्या बंधपत्रावर मुक्त केल़े. संतोष यशवंत पवार, अमित सदानंद पवार (दोन्ही ऱा सांडेलावगण, वाकणवाडी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपिंची नावे आहेत़ तर यातील तिसरा आरोपी रूपेश सदानंद पवार (ऱा सांडेलावगण) यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होत़ा.
रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा तर सरकारी पक्षाकडून ऍड़ विद्यानंद जोग यांनी काम पाहिल़े. खटल्यातील माहितीनुसार पंकज जवाहरलाल कश्यप (25, जयगड, गणेशवाडी) हे 22 जानेवारी 2019 रोजी कामगारांच्या जेवणाचे डबे घेवूण जाण्याकरीता आपल्या ताब्यातील कार (एमएच 08 डब्ल्यू 4670) ही सांडेलावगण वाकणवाडी येथे उभी करून ठेवली होत़ी. यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी यांनी कार इथून घेवून जा असे सांगितल़े. यावर कश्यप याने डबे भरताच आपण निघून जावू असे आरोपी यांना सांगितल़े. यातून कश्यप व आरोपी यांच्यात वाद निर्माण झाल़ा. कश्यप यांनी आपली कार हटविली नाही या रागातून अमित, संतोष व रूपेश पवार यांनी कश्यप यांना हातीच्या ठोशाने, काठीने जोरदार मारहाण केल़ी. तसेच तक्रारदार यांच्या ताब्यातील कारच्या काचा फोडून नुकसान केल़े अशी तक्रार कश्यप यांनी जयगड पोलिसांत दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी आरोपि यांच्याविरूद्ध भादंवि कलम 324, 327, 451, 341, 323, 336, 504, 506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच गुह्यांचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दीपक साळवी यांनी करून आरोपिंविरूद्ध दोषारोपपत्र ठेवल़े. आरोपि यांच्याविरूद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावल़ी. एकूण 17 साक्षिदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आल़े. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून जयगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनंत जाधव यांनी काम पाहिल़े.