(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ग्रामदेवता श्री चंडिकादेवी मंदिर व्यवस्थापक समितीच्यावतीने श्री चंडिकादेवीच्या शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवार दि.6 मार्च ते रविवार दिनांक 12 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. यांमध्ये सोमवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदेवता चंडिका देवीच्या मंदिरात रुपे लावणे, दुपारी तीन वाजता चंडिका मंदिरात सभा व होळी तोडणे सायंकाळी सात वाजता होळी आणणे तर मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी सहा वाजता चंडिका मंदिरातून पालखी उठवणे, सकाळी नऊ वाजता माड अर्थात होळी उभी करणे, सकाळी दहा वाजता होम लावणे तर रात्री साडेनऊ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम सादरकर्ते भगवती महिला मंडळ मराठवाडी मालगुंड व इतर असे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच बुधवारी दिनांक ०८ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हळदी कुंकू भगवती महिला मंडळ मराठवाडी मालगुंड व इतर तर रात्री साडेनऊ वाजता नमन सादरकर्ते दुर्गवळीवाडी- आग्राडी नमन मंडळ,मालगुंड त्याचबरोबर दि. ०९ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ६ वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम चंडिका महिला मंडळ मालगुंड यांचेमार्फत, शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता पारंपारिक नृत्यावर आधारित विविध गुणदर्शन कार्यक्रम सादरकर्ते मालगुंड गावातील सहभागी महिला मंडळे आणि रविवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी आठ वाजता पालखी शिंपण्यासाठी मार्गस्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आव्हान मालगुंड श्री चंडिकादेवी मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.