ईशान्य भारतातील ३ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरा नागालँडमध्ये भाजप आघाडीने बहुमताचा आकडा पार करत सत्ता राखली, तर मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) सर्वाधिक जागा मिळाल्या असून येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून सरकार स्थापन करण्यासाठी मदत मागितली आहे. त्यामुळे मेघालयातील सरकार स्थापनेत देखील भाजपची महत्त्वाची भूमिका असणार आहे. येथेही भाजपच सत्तेत असेल.
मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी २७ फेब्रुवारी रोजी, तर त्रिपुरात १६ फेब्रुवारीला मतदान झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर हळूहळू निकाल हाती येताच चित्र स्पष्ट झाले. त्रिपुरात ६० पैकी सर्वाधिक ३२ जागा मिळवत भाजप आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्रिपुरात सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाला असला तरी येथे मागील वेळेच्या तुलनेत पक्षाच्या ४ जागा घटल्या आहेत. डाव्या आघाडीला ११ आणि त्रिपुरा मोटा पार्टीला १३ जागा मिळाल्या आहेत. नागालँडमध्ये एनडीएची सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) आणि भाजपला मिळून ६० पैकी सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या आहेत. मागील वेळेच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये ७ जागांची वाढ झाली आहे, तर मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) ६० पैकी सर्वाधिक २६ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा ३१ आकडा गाठण्यासाठी एनपीपीने २ जागा मिळवलेल्या ‘भाजपचा पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे येथील सत्तेतही भाजपचा सहभाग राहील अशी शक्यता आहे.
इतर राज्यांत काम करणे आणि पूर्वेकडील राज्यात काम करणे यात फरक आहे. पूर्वेकडील राज्यातील निकालांचे दिल्लीत फार कौतुक होत नव्हते. चर्चा व्हायची ती फक्त हिंसाचाराची. आता पूर्वेकडील राज्यांचा विकास मला दिसत आहे. दिल्ली आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मनोमीलन होत आहे. नव्या विचारांचा हा परिणाम आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !