(राजापूर)
मिठगवाने गावात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि ग्रामपंचायत मिठगवाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर गुरुवारी संपन्न झाले. या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. उज्ज्वला पवार, अस्थितज्ज्ञ डॉ. विवेक पोतदार, डॉ.सौ. प्रज्ञा पोतदार, डेंटिस्ट डॉ. राखी लांजेकर, फिजिओथेरपीस्ट डॉ. संदीप करे, जनरल प्रॅक्टिशनर डॉ सौ स्वप्ना करे मॅडम तसेच नेत्र चिकित्सासाठी लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरीची टीम मिठगवाणे येथे उपस्थित होती.
सर्वप्रथम रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड.सौ. आंबुलकर मॅडम, सचिव श्री. गांधी, खजिनदार श्री. सावंत तसेच रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी यांचा आणि सर्व डॉक्टर्स यांचा तसेच व्यासपीठावर उपस्थित राजा काजवे, कणेर, कुवेशी ग्रामपंचायत सरपंच मोनिका कांबळी, मोहिते, कांबळे यांचा ग्रामपंचायत मिठगवाने यांच्यामार्फत सरपंच सौ. आशा काजवे तसेच ग्रा. पं. सदस्य यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर आरोग्य शिबीर ज्यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने आयोजित करण्यात आले ते अंजनेश्वर मेडीकलचे सर्वेसर्वा श्री सचिन कांबळी यांचा रोटरी क्लबच्या अध्यक्षा अॅड.सौ. अंबुलकर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित ग्रामस्थांपैकी जेष्ठ मार्गदर्शक व नागरिक भाई काजवे यांचाही रोटरी क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला
सत्कार समारंभानंतर मिठगवाने गावच्या सरपंच सौ. आशा काजवे तसेच क्लबच्या अध्यक्षा अॅड.सौ. आंबुलकर मॅडम आणि सेक्रेटरी बिपिनचंद्र गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिबिरास शुभेच्छा दिल्या व त्यानंतर अॅड.सौ.आंबुलकर मॅडम यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. पंचक्रोशीतील जवळ जवळ 150 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य तपासणी शिबीरासाठी मिठगवाने ग्रामपंचायतचे ग्रा. पं.सदस्य सौ. जान्हवी गावकर, प्रणिता आडीवरेकर, उत्तम पावसकर, संतोष पाटणकर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. सत्यवान कणेरी, श्री. पंगेरकर, श्री. संतोष जैतापकर, कैलास कांबळ, विनायक पावसकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.