(रत्नागिरी)
जाकादेवी येथील बसस्टॉपच्या पुढे चालत जाणार्या महिलेला धडक देऊन फरार झालेल्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाग (पूर्ण नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महिलेचे पती बाळू चव्हाण (70, सध्या जाकादेवी, मूळ कोल्हापूर) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना बाळू चव्हाण (50, जाकादेवी, रत्नागिरी) या निवळी ते जाकादेवी रोडने चालत होत होत्या. यावेळी घाग हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन जाकादेवी, खंडाळा ते रत्नागिरी जात होता. यावेळी जाकादेवी बस स्टॉपच्या समोर कल्पना चव्हाण यांना धडक दिली. या धडकेत कल्पना यांच्या उजव्या कोपराला गंभीर व किरकोळ दुखापत झाली. दुचाकीस्वार घाग हा कल्पना यांना उपचारासाठी न नेता तिथून निघून गेला.
याप्रकरणी बाळू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घाग याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.