(संगमेश्वर)
सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कलांगण (संगमेश्वर) या संस्थाच्या वतीने अध्यात्मासाठी रत्नागिरी सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. याच्या नोंदणीला सायकलस्वारांचा प्रतिसाद लाभला आहे. एकूण ४२ किलोमीटरचा हा मार्ग असून सकाळी ६ वाजता संगमेश्वर येथून प्रारंभ होणार आहे.
गेली तीन वर्ष सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणातील दुर्गम भागातील ठिकाणे जागतिक पटलावर पोहोचावीत, यासाठी सायक्लोथॉनचे आयोजन करत आहे. २०२१ मध्ये पेडल डेली स्टे फीट हे घोषवाक्य घेऊन ही सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे दरम्यान झाली. २०२२ मध्ये पेडल फॉर पेट्रोग्लिफ म्हणजे कातळशिल्पांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने थिबा राजवाडा ते देऊड कातळशिल्प अशी सायक्लोथॉन झाली.
सायक्लोथॉनमध्ये रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पुणे, कऱ्हाड, सिंधुदुर्ग, खेड, दापोली, चिपळूणमधून मोठ्या प्रमाणात सायक्लोथॉनसाठी सायकलस्वारांनी नोंदणी केली आहे. सायकलस्वारांना आदल्या दिवशी निवास, रात्रीचे जेवण, सकाळी अल्पोपहार, स्पर्धेदरम्यान हायड्रेशन पॉईंट, मदतीसाठी वाहन, वैद्यकीय मदत, प्रत्येक सहभागींना पदक, आणि सांगता कार्यक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सायकलप्रेमीनी पुढील लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी, कलांगणचे श्रीनिवास पेंडसे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे दर्शन जाधव, योगेश मोरे यांनी केले आहे.
महाराज तेजस्वी
श्री रंग अवधूत महाराजांची बुद्धी तेजस्वी होती, स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. विसाव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी दत्तप्रसार सुरू केल्यावर कधीही त्यांनी धन, द्रव्य घेतले नाही. कोणी पैसे ठेवले तर ते सबंध दिवस उपवास करत. त्यांनी कधीही भाषण, प्रवचन केले नाही. कृतीमधून सर्वाना मार्गदर्शन केले. अशा श्री रंग अवधूत स्वामींच्या जन्मस्थळी पेडल फॉर स्पिरिच्युअलीटीच्या माध्यमातून 5 तारखेला जास्तीतजास्त सायकलप्रेमी पोहोचतील.
नोंदणीसाठी लिंक : http://bit.ly/3YUdyPm