(जीवन साधना)
आपल्या धर्मग्रंथांत अशा अनेक मंत्रांविषयी सांगितले आहे, ज्यांचा जर आपण विधीपुर्वक जाप केला तर प्रत्येक अडचणीपासून आपला बचाव होऊ शकतो. असाच एक मंत्र आहे महामृत्युंजय. मान्यता आहे की, या मंत्राच्या जापाने मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. हा मंत्र वेदांपासून घेतला आहे. या मंत्रामध्ये भगवान शिवच्या महिमेचे वर्णन आहे. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात. महामृत्युंजय मंत्र जाप हा निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात. महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. श्री त्र्यंबकेश्वराला दुखाचा आणि दानवाचा विनाशक म्हणतात. महामृत्युजंयचा अर्थ मृत्यूला जिंकणारा असा असून असा आहे महामृत्युंजय मंत्र…
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
1. सकाळी स्नान केल्यानंतर सावधानतापुर्वक या मंत्राचा जाप करा. बोलताना शब्दांची काळजी घ्या.
2. मंत्र जाप करताना धूप-दीप प्रज्वजित ठेवा. जाप केवळ रुद्राक्षाच्या माळेनेच करा.
3. मंत्राचा जाप त्या ठिकाणी करा जेथे भगवान शिव यांची मुर्ती, फोटो किंवा महामृत्युजंय यंत्र ठेवलेले असेल.
4. मंत्राचा जाप एकाग्रतेने करा. मनाला भटकू देवू नका.
5. जर स्वत: या मंत्राचा जाप करू शकत नासाल तर योग्य पंडितातर्फे या मंत्राचा जाप करून घ्यावा.
महामंत्राचा जाप केल्याने कोणत्या बाधा दूर होतात :
- ज्योतिष शास्त्रानुसार जन्मकुंडलीतील ग्रहदोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशेचा अशुभ प्रभाव दूर करण्यसाठी.
- स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठी.
- कुटुंब, समाज आणि संबंधामधील कलह दूर करण्यासाठी.
- एखाद्या गंभीर आजाराच्या पीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी.
- महामारीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी.
- वात(वायू), पित्त (ताप), आणि कफ (शीत) दोषामुळे निर्माण झालेल्या रोगांपासून दूर राहण्यासाठी.
- वैवाहिक संबंधामध्ये बाधक नाडी दोष किंवा इतर बाधक योग दूर करण्यासाठी.
- मानसिक तणाव आणि क्रोधामुळे निर्माण झालेली अस्वस्थता नष्ट करण्यासाठी.
- अपघात किंवा आजारामुळे जीवावर आलेल्या संकटातून मुक्तीसाठी.
- महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यु होत नसतो. अणि मृत्युचे भय आपल्या मनातुन निघून जाते. कारण हा मंत्र मृत्युवर विजय प्राप्त करणारा प्राणरक्षक मंत्र आहे.
महामृत्यंजय मंत्राचा अर्थ :
हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्व जण तुझी पुजा आराधना करतो.जो आमचे पोषण करतो,ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातुन मुक्त होत असतात.त्याचप्रमाणे आम्ही मृत्यु अणि नश्वरतेपासुन मुक्त होऊ. हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणारया मृत्युच्या विळख्यातुन आम्हास बाहेर काढ.अणि आम्हाला अमृतत्व प्रदान कर.आम्ही हा संसार सोडुन तुझ्या चरणाशी येऊ अणि अमर होऊ असा तु आम्हाला आशीर्वाद दे.
महामृत्यंजय मंत्राचा जप कधी करावा?
● जेव्हा आपण एखाद्या दुर्घटनेत, एखाद्या संकटांत सापडलो असेल तेव्हा आपण या मंत्राचा जप करायला हवा.
● अंगाचा थरकाप होऊन भीती वाटत असेल तेव्हा या मंत्राचा जप करावा.
● रात्री झोपेत वाईट स्वप्र पडुन अचानक दचकुन उठण्याची समस्या असेल तर आपण हा मंत्र जपायला हवा.
● आपण आजारी आहात अणि औषधपाणी करूनही बरे होत नाही तर अशावेळी आपण महामृत्यंजय मंत्राचा जप करायला हवा.
● घरासमोर लावलेली झाडे वनस्पत्या आपोआप वाळु लागल्यास आपण या मंत्राचा जप करावा, असे म्हटले जाते
● एखाद्या विषयाबाबतीत चिंतित असाल तर अशा वेळी महामृत्यंजय मंत्र जपावा.