(संगमेश्वर)
तालुक्यातील डिंगणी पिरदवणे येथे मच्छी विक्रेत्या सुविधा रिजवान सय्यद यांचा खून केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आता या खुनातील आरोपींची संख्या दोन झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की मच्छी विक्रेत्या सहिदा सय्यद या मच्छी विक्री करून उदरनिर्वाह करायच्या. त्या 15 फेब्रुवारी रोजी मच्छी विक्री करून घरी परतत असताना दुपारच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी खून झाल्याच्या दृष्टीने तपास करत जयेश गमरे याला अटक केली होती. त्यानंतर आणखी खुनाचा संशय आल्याने पोलिसांनी उत्तम भिकाजी कमरे याला अटक केली आहे. त्याने शिमग्यासाठी पैशाचे गरज असल्याने मच्छी वाली महिलेला जयेशच्या संगतीने खून केल्याची कबुली दिली आहे.
पीरदवणे परिसरातील कारवाशेत येथे गुरे चरवत असताना जयेश आणि उत्तम यांना ही मच्छी वाली जाताना दिसली. शिमग्यामध्ये पैशाची गरज आहे याची जाणीव झाल्याने या दोघांनी तिला एकटीला गाठत दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर तिला जंगलमय भागात नेऊन टाकून ठेवले. त्यानंतर पैशाची चोरी करून दोघे फरार झालेले होते. खुनाची माहिती सर्वत्र पसरतात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
तपासा दरम्यान प्रथम जयेश याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर आणखी एक संशयित असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करत उत्तम भिकाजी कमरे यालाही अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत.