तेजा मुळ्ये, रत्नागिरी
खूप जून पण दुमजली घर असावं. झाडाची फांदी डोकावते आहे त्यामुळे त्या घरात वस्ती अजूनही असावी असं वाटत आहे. एकूण कारभार शांत पण काही गूढ असेल का असं सहज मनात येऊन जात. हा फोटो काढण्याचा एक क्षण असला तरी ही प्रतिमा न्याहाळताना त्याबरोबर बराच संवाद होतो आहे.
जेव्हा हा फोटो मी पहाते तेव्हतेंव्हा त्यात काही वेगळं सापडत. त्या फोटोत प्रत्यक्ष दिसत नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी संदर्भाने त्यात डोकावतात. पक्षी कोणी यावा म्हणून प्रतीक्षा आहे की ,,,,, कोंडलेल्या पक्षाला दार उघड करून वाट मोकळी करून संधी दिली गेली आहे? काय असेल,,,,,