(डिजी टेक)
मोबाईल असणाऱ्या प्रत्येकाकडे Whatsapp डाऊनलोड केलेले असते. Whatsapp शिवाय आज कोणतंही काम होऊ शकत नाही. Whatsapp ग्रूप्समुळे तर आज अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. एकाच वेळी अनेकांना संदेश पाठवणेही सोपं झालंय. १० वर्षांपूर्वी कुणी याचा विचारही करु शकत नव्हतं. मात्र Whatsapp वापरताना एक अडचण नेहमी येते की, तुम्ही ऑनलाईन असता व चॅटिंग करत असताना सर्वांना समजतं की तुम्ही ऑनलाईन आहात. मग नको असणार्या मेसेजेसचा सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होते. अशा वेळी उत्तर देणेही भाग पडते, शिवाय आपली प्रायव्हसी गमावत असल्याची आपली भावना होते. यावर पर्याय व इतरांना कळू नये म्हणून आपण बर्याचदा ऑनलाईन येत नाही. मात्र आता या अडचणीवर तोडगा निघाला आहे. तुम्ही ऑनलाईन असाल तरी कुणालाही कळणार नाही.
तुम्हाला जर ऑनलाईन स्टेटस दाखवायचा नसेल तर सर्वात आधी तुम्हाला Whatsapp चा अद्ययावत व्हर्जन डाऊनलोड करावा लागेल. आता तुम्हाला उजवीकडे वरच्या बाजूला तीन डॉट्सवर टिक करावे लागेल. त्यानंतर सेटिंग्जमध्ये प्रवेश करा. सेटिंग्जमध्ये प्रायव्हसी पार्यायावर टिक करा. मग लास्ट सीन ऍंड ऑनलाईन वर टिक करा.
मग तुम्ही निर्णय घेऊ शकता की लास्ट सीन कोण पाहू शकतं. तुम्ही Nobody हा पर्याय निवडू शकता. who can see when i’m online मध्ये दोन पर्याय आहेत, जसे की everyone आणि same as last seen. आता तुम्हाला कोणता पर्याय निवडायचाय हा तुमचा निर्णय आहे. अशा प्रकारे तुम्ही Whatsapp चॅट करु शकता आणि online दिसण्याचं टेन्शनही तुम्हाला सतावणार नाही.