( नवी दिल्ली )
काँग्रेसचं ८५ वं महाअधिवेशन सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित आहेत. सोनिया गांधी आज अधिवेशनात हजर राहिल्या. काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं. या यात्रेमुळे काँग्रेस आणि जनतेचं एक नातं पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारवर यावेळी त्यांनी जोरदार टीका केली. केंद्र सरकारने देशातील केंद्रीय यंत्रणांचा ताबा मिळवला आहे. सध्याच्या काळात भारतात जाणीवपूर्वक अल्पसंख्यांकांना लक्ष केले जात आहे. अल्पसंख्यांक समाजावरील हल्ले वाढले आहे. देशात जातीपातीचे राजकारण पेरले जात आहे. देशाच्या एकतेला धोका असून, या विरोधात एकत्र येणे ही काळजी गरज आहे,” असे आवाहन करत कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
छत्तीसगड येथे कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेश सुरू आहे. या अधिवेशनात संबोधित करतांना सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारला लक्ष केले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, कॉँग्रेस पक्ष हा समानता मानणारा पक्ष आहे. समानता, बंधुता, राष्ट्रीयता या सारखी मूल्ये ही कॉँग्रेसने जपली असून त्यासाठी लढा देखील दिला आहे. कॉँग्रेसने हा भारतीयांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. कॉँग्रेस केवळ राजकीय पक्ष नाही तर भारतीयांचे हक्काचे व्यासपीठ आहे. या पूर्वी कॉँग्रेसने अनेक लढाया लढल्या आहेत. आणि आताही लढणार आहे. सध्या राज्यात काही पक्षाकडून जातीय द्वेष पासरवला जात आहे. यामुळे देश एकसंघ घेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि लढावे असे आवाहन देखील सोनिया गांधी यांनी यावेळी केले. दलित, अल्पसंख्यांक, महिलांवर अत्याचार होत आहेत. पण सरकार केवळ काही उद्योगपतींच्या पाठिशी उभे आहे. हे सांगतानाच सोनिया गांधी म्हणाल्या, भारत जोडो यात्रेनंतर माझी राजकीय कारकीर्द संपुष्यात येऊ शकते. काँग्रेससाठी हा एक यशस्वी टप्पा मानला जाईल.