(मुंबई)
औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असं होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. मात्र औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमने सरकारला थेट आव्हान दिले आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देत थेट आव्हानाची भाषा केली आहे, त्यामुळे या मुद्द्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
इम्तियाज जलिल काय म्हणाले ट्विटमध्ये…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना जलिल म्हणाले, ‘औरंगाबाद आमचं शहर होतं आणि आहे. आता औरंगाबादमध्ये आमच शक्ती प्रदर्शन बघा. आमच्या प्रिय शहरासाठी आम्ही मोर्चा काढणार. औरंगाबादकरांनो शहरांच्या नावाचं राजकारण करणाऱ्या या शक्तींचा (भाजप) पराभव करण्यासाठी तयार व्हा. आम्ही याचा निषेध नोंदवतो, आम्ही लढू,’ असं ट्वीट इम्तियाज जलिल यांनी केलं आहे.
Aurangabad is, was and will always be our city. Now wait for our show of strength for Aurangabad. A massive morcha for our beloved city! Get ready Aurangabadis to defeat these forces (BJP) playing politics in the name of our city. We condemn & we will fight. https://t.co/ItvoTHcXAB
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) February 24, 2023
तर दुसरीकडे इम्तियाज जलिल यांनी मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटवरही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीसाहेब औरंगाबाद आमचं शहर आहे, तुमचं नाही, असं ट्वीट इम्तियाज जलिल यांनी केलं आहे.
Aurangabad is our city. Not your’s Mr CM. https://t.co/5fGXS4j8DP
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) February 24, 2023
इम्तियाज जलिल यांच्या या ट्वीटला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही रिट्विट करून इम्तियाज जलिल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.