(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील शेतात लावलेल्या फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील संतोष भुवड आणि धोंडू भुवड यांच्या शेतीमध्ये फासकीत बिबट्या अडकला असल्याची माहिती संदीप यशवंत सुगदरे यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागला दिली. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक आवश्यक साहित्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या बिबट्याला काही वेळातच सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
वनविभागाच्या बचाव पथकामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री कीर, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक राजाराम शिंदे, वनरक्षक कृष्णा इरमले, वाहन चालक नंदकुमार कदम यांचा सहभाग होता.