(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथे जीवाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीच नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला असतात. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.