( पाचल / वार्ताहर )
पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट गाईड चे विद्यार्थी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक उपक्रम यशस्वी करताना दिसले आहेत. अशाच एका उपक्रमामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी आज केला आहे.
आज 22 फेब्रुवारी हा दिवस. स्काऊट- गाईड चे जनक “लॉर्ड बेडेन पोवेल” यांचा जन्म दिवस. हा दिवस संपूर्ण जगामध्ये चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. या चिंतन दिनानिमित्त संपूर्ण जगामध्ये वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबीविले जातात. या दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यामंदिर, व कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट -गाईड च्या सर्व विध्यार्थ्यानी आणि ग्रामपंचायत पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने आज या चिंतन दिनाची सामाजिक बांधिलकी जपून गावातील विशेष असा एक भाग ठरवून या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याचे आयोजन केले होते.यामध्ये स्काऊत – गाईड च्या मुलांसोबत स्काउटर संजय पाथरे सर व गाईडर मोहिनी परुळेकर मॅडम यांच्या नियोजनाने ग्राम स्वच्छता अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये ग्रामपंचायत पाचल सदस्य, नफिस बोबडे, मुख्य लिपिक सुहास बेर्डे, कल्पेश सुतार, कर्मचारी सुभाष काळे, सौ जाधव.व अन्य कर्मचारी तसेच सरस्वती विद्या मंदिर हाईस्कुल चे सिद्धार्थ जाधव सर, संजय पाथरे सर,मोहिनी परुळेकर मॅडम सहित बहुसंख्येने स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कित्येक दिवस रस्त्याने चालताना कचऱ्याचे वाढलेले साम्राज्य, येणारी दुर्गंधी आणि संपूर्ण अस्वछ परिसर ग्रामस्थांना बघवत न्हवता,तो परिसर आज स्वच्छ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे आणि त्यांच्या कार्याचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.