(चिपळूण /ओंकार रेळेकर )
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग पदाधिकाऱ्यांनी उद्योग मंत्री मा.ना. उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी सोमवारी भेट घेतली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक .राहुल भैय्या दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली ना. उदय सामंत यांच्या निवासस्थानी भेटीदरम्यान पोलीस परिवार पोलीस पाल्यांसाठी होणाऱ्या अडचणी यांचा सामना करण्यासाठी पोलीस महामंडळाची स्थापना व्हावी यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच पोलीस पाल्य जे की, शिक्षण पूर्ण घेऊन सुद्धा नोकरी अभावी घरीच आहेत अशा पाल्यांना कुठेतरी नोकरीत रुजू करून घेण्यासाठी सरकारने चांगल्या प्रकारचे योजना करावी अशी विनंती करण्यात आली.
तसेच घरातील किंवा गावातील अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र काढण्यासाठी दवाखान्यातील अनेक ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात, त्यात त्यांचे हेळसांड पाहता शासनाने एक टेबल एक खिडकी हा उपक्रम राबवून त्यातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख सैफ सुर्वे सहित इतर पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन नामदार उदय सामंत यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी मांडलेल्या वरील मुद्यावर चर्चा करून लवकर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले व अपंग व्यक्तीची होणारी हेळसांड पाहता त्यांचा मुद्दा आजच रत्नागिरी जिल्हा मीटिंग मध्ये मांडणार आहोत असे अश्वासन दिले. आपला मौल्यवान वेळ देत आपल्या सोबत सविस्तर चर्चा करून सगळे मुद्दे सविस्तर जाणून घेतल्याबद्दल ना. उदय सामंत यांचे महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेने आभार मानले. यावेळी कोकण विभागातील विभाग प्रमुख सैफ सुर्वे, कोअर कमिटी सदस्य राम पाळवडे, युवक जिल्हाध्यक्ष आतिफ गोठे, संगमेश्वरी कट्ट्याचे मालक आतिफ सुर्वे, वासीउल्लाह घारे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ना.उदय सामंत यांना निवेदन देताना सैफ सुर्वे व मान्यवर
(छाया : ओंकार रेळेकर)