( संगमेश्वर / प्रतिनिधी )
आंबा घाट येथील चक्रीवळणावर रत्नागिरी कोल्हापूर रोडवर पिकअप टेम्पो व टोयाटो कार यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर शमशुद्दीन रुकडीकर (22, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप टेम्पो चालक जुबेर रुकडीकर हा आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरीकडे चालला होता. यावेळी आंबा घाटातील चकी वळणावर टोयोटा कारला उजव्या बाजूने जोरदार ठोकर दिली. या अपघात दोन पवाशांना दुखापत झाली. तसेच दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद चव्हाण यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी टेम्पो चालक जुबेर रुकडीकर याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.