(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड-भंडारवाडा येथे विनापरवाना गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयन महादेव खेऊर (वय ४७, रा. मालगुंड – भंडारवाडा, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१६) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित महिलेकडे ८८० रुपयांची गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य सापडले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रशांत लोहळकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.