(चिपळूण)
समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना कंटेनरने एसटी बसगाडीला धडक दिल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ४.३० वा. मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते येथे घडली. या प्रकरणी येथील पोलिसात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालकाचे नाव व गाव मिळू शकले नाही.
या बाबतची फिर्याद विठ्ठल प्रल्हाद जाधव (३७, सध्या चिपळूण, मुळ वाशिम) यांनी दिली. ते एसटी बसगाडी घेऊन चिपळूण आगारातून मुंबई – गोवा महामार्गावरील खेडच्या दिशेने जात होते. ते कळंबस्ते मोहल्ला एसटी थांब्यावर आले असता बसगाडीतील प्रवासी उतरतेवेळी गोव्याच्या दिशेने आलेल्या कंटेनरने ओव्हरटेक करत या बसगाडीला चालक बाजूस धडक दिली. या प्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.