(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथे राहणारे रवींद्र गोपाळ दुर्गवळी वय वर्षे 54 यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान घडून आली.
याबाबत अधिक माहिती अशी की रविंद्र गोपाळ दुर्गवळी हे मूळचे मालगुंड दुर्गवळीवाडी येथे राहणारे असून ते मुंबईमध्ये नोकरीला होते. मात्र त्यांच्या डाव्या हाताला दुखापत होऊन त्यांचा डाव हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे ते आपल्या हाताला दुखापत झाल्याकारणाने एक महिन्यापूर्वी गावी आले होते. ते मोल मुजरी करून आपले वास्तव्य करीत असताना ते अधून मधून आजारी देखील पडायचे.
दरम्यान, 17 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरामध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे ते दिसून आलेले नाहीत. यावेळी त्यांची मुलगी ऋतुजा ही शाळेतून घरी आली असता मोठमोठ्याने रडू लागली. यावेळी तिची शेजारची काकी श्रेया दुर्गवळी यांनी घरामध्ये येऊन पाहिले असता पाहिले असता, आपले सासरे रविंद्र गोपाळ दुर्गवळी हे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. यावेळी त्यांनी तात्काळ आपले पती संजय दुर्गवळी यांना फोन करून सांगितले. त्यानंतर संजय दुर्गवळी हे आपल्या कामावरून ताबडतोब घरी आले असता त्यांनी घरामध्ये पाहिले असता आपले चुलते रवींद्र गोपाळ दुर्गवळी हे गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिले.
त्यानंतर या विषयीची तात्काळ खबर त्यांनी मालगुंड गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राला दिल्यानंतर घटनास्थळी भेट दिली.त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर सदर मृतदेहाचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शवविच्छेदन करण्यात आले. सर्व सोपस्कार झाल्यावर मृतदेह ताब्यात देण्यात आला. मयत रवींद्र गोपाळ दुर्गवळी यांच्या पश्चात पत्नी, चार मुली ,मुलगा,भाऊ,पुतणे असा परिवार आहे. त्यांनी आपल्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.