(लांजा)
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूचे बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या वृत्त आपण अनेकदा ऐकले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी देखील बेकायदेशीर दारूधंदे विरोधात कारवाई कडक केली आहे. तसेच नागरिकांना बेकायदेशीर रित्या दारूधंदे करणाऱ्यांची माहिती द्या; आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे देखील आवाहन करण्यात आले होते.
तालुक्यातील वाडीलिंबू सापुचेतळे येथे बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू बाळगणाऱ्यांनवर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. बेकायदेशीर रित्या चपलांच्या दुकानातून, किराणा मालाच्या दुकानातून दारू विक्री होत असल्याने तेथील नागरिक देखील याबाबत संतप्त भूमिका व्यक्त करीत होते. अशातच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत संतोष सोना चव्हाण याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 65(e)अन्वये लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार दिनांक 13.02. 2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांनी सायंकाळी केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांना संतोष सोना चव्हाण हे आपल्या चप्पलच्या शॉप मधून व बांधलेल्या चाळीतील गाळ्या मधून चोरट्या व बेकायदेशीर पद्धतीने देशी विदेशी दारुची विक्री होत असल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कारवाई केली, मौजे वाडीलिंबू सापुचेतळे खानवली रस्त्याच्या शेजारी संतोष चव्हाण यांच्या चाळीतील गाळा क्र 1 व 6 येथे मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू मिळाली.
त्याचे वर्णन पुढील प्रमाणे 1) 6720/- देशी दारू संत्रा जीएम 180 मिली मापाच्या 96प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या प्रत्येक बाटलीवरील किंमत 70/-2)5250/-देशी दारू संत्रा जीएम 90 मिली मापाच्या 150 प्लास्टिकच्या बाटल्या प्रत्येक बाटलीवरील किंमत 35/- 3)15360/- मॅक्डोल नं 1 विदेशी दारूच्या 180 मिली मापाच्या 96 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीवरील किंमत 160/- 4) 8640/- स्ट्रग व्हिस्की दारूच्या 180 मिली मापाच्या 48 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीवरील किंमत 160/- 5)2220 /- ट्युबर्ग स्ट्रग बियर 650 मिली मापाच्या 12 काचेच्या सीलबंद बाटल्या प्रत्येक बाटली वरील किंमत 185/- 6) 6720/- देशी विदेशी दारू संत्र जीएम 180 मिली मापाच्या 96 प्लास्टिकच्या प्रत्येक बाटली वरील किंमत 70/- 7) 7000/- देशी विदेशी दारू संत्र जीएम 90 मिली मापाच्या 200 प्लास्टिक च्या प्रत्येक बाटली वरील किंमत 70/- 8) 7680 /- मॅक्डोल नंबर 1देशी विदेशी 180 मीली मापाच्या 48 बाटल्या प्रत्येक बाटलीवरील किंमत 160/- 9)5520 /-मॅक्डोल 90 मिली मापाच्या 69 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली वरील किंमत 80/- 10 ) 6400 /- इंपिरियल ब्लु व्हिस्की दारूच्या 180 मिली मापाच्या 40 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली वरील किंमत 160/- 11)6640 /- इंपिरियल ब्लु व्हिस्की 90 मिली मापाच्या 83 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटलीवरील किंमत 80/- 12) 3220 /- डीएसपी व्हिस्की दारूच्या 180 मिली मापाच्या 23 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली वरील किंमत 140/- 13 ) 2220 /- स्टुबर्ग स्ट्रग बियर 650 मिली मापाच्या 12 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली वरील किंमत 185/- 14) 1920 /- लंडन पिन्सर बियर 650 मिली मापाच्या 12 काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली वरील किंमत 160/- असा एकुण 85,510 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली ही कारवाई मोठी समजली जात आहे. या कारवाईत पोलीस नितीन प्रभाकर डोमणे, संजय कांबळे, सुभाष भागणे, बाळू पालकर असे सरकारी वाहन क्रमांक एमएच 08/एएक्स 4973 चालक अतूल कांबळे. आदी. या टीमने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.