(मुंबई)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कडून घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येत आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील 4752 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. या संदर्भातील तारखांची माहिती आता समोर आली आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 मार्च असणार आहे. तर लॉटरीची सोडत 11 एप्रिल रोजी होणार आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येईल. या सोडतीबाबत अधिक तपशील पुढील प्रमाणे
- अर्जाची नोंदणी – 5 जानेवारी 2023 पासून सुरू
- अर्ज विक्री – 20 फेब्रुवारी 2023 पासून
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
- स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर – 5 एप्रिल 2023
- सोडत कधी जाहीर होणार – 11 एप्रिल 2023
योजनेत असलेली घरे
- पंतप्रधान आवास योजनेतील 984 घरे
- 20 टक्के योजनेतील 1 554 घरे
- म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 129 घरे
- प्रथम येणाऱ्याला प्राधान्य तत्वावरील 2085 घरे
विभागवार घरांची संख्या
पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 340 घरे शिरढोण येथे, विरार-बोळिंज येथे 328 घरे, 256 घरे गोठेघर येथे, खोणी येथे 60 घरे अशी एकूण 984 घरे आहेत. या घरांच्या किमती 14 लाख 96 हजारांपासून ते 21 लाख याच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.