(रायगड)
आयकर विभागाने बुधवारी पुण्यात सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्यानंतर रायगड जिल्ह्यातील रोहा येथेही धाड टाकली आहे. जवळपास १४ वाहनांमधून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी, पोलिसांनी देशपांडे यांच्या रोह्यातील केळतवाडी फार्मवर धाड टाकली आहे. एवढ्या मोठ्या तयारीने धाड टाकण्यात आल्याने रायगडमध्ये खळबळ उडाली आहे.
सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत. देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे.
अनिरुद्ध:देशपांडे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एका आघाडीचा समूह आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी सिटी ग्रुपची स्थापना केली असून ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुण्यात सिटी ग्रुपचे अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प साकारले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीये सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांड यांच्या रायगड जिल्ह्यातील रोहा येथील फार्मवर धाड टाकली आहे. 4 गाड्यांमधून आयकरचे अधिकारी व पोलीसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे.
या कारवाईत आयकर विभागाच्या पथकाने महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक साधने व संगणकाच्या हार्डडिस्क जप्त केल्या असल्याचे माहिती मिळत आहे.