(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास,कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व कॉमर्स अँड सोशल फोरम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी हा व्याख्यानपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मनोहर पाटील उपस्थित होते. श्री. पाटील यांनी बँकिंग क्षेत्रातील करिअर संधी, बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या स्पर्धा परीक्षा व त्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, कॉमर्स अँन्ड सोशल फोरम विभागप्रमुख सौ. निलोफर बन्नीकोप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राखी साळगावकर यांनी केले तर प्रा. वैभव कीर यांनी आभार मानले.