(चिपळूण)
तालुक्यातील अनारी हनुमान वाडी येथे हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रूमचे लॉक तोडून रूम मधील कपाटातील 51 हजार दोनशे रुपयांची रक्कम लांबवल्याची घटना 8 फेब्रुवारी रात्री 10 ते 9 फेब्रुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद संजय दौलत जाधव (53 खाजगी नोकरी चिपळूण) यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.