( खेड / प्रतिनिधी )
गायी विक्री व्यवहार करतो सांगून खात्यावर पैसे जमा करण्यास सांगून तरुणाची ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना खेड आंबये येथे घडली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद दिनेश सकपाळ (४०, दुध व्यवसायिक, आंबेये, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश सकपाळ हे दुध व्यवसाय करतात. त्यांच्या मोबाईलवर १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने गाडी विकण्याचा व्यवहार करणारा अशी ओळख सांगितली. वेळोवेळी गायी विक्री करणारा अशी ओळख सांगून दिनेश सकपाळ यांचा विश्वास संपादन केला. सकपाळ यांना गायी विकत देतो सांगून त्याने आपल्या बँक खात्यावर ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ५० हजार रुपये भरले. मात्र गायी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सकपाळ यांच्या लक्षात आले. त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भावविकलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.