( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे- शितपवाडी येथील वृद्ध महिलेला भाकरी खाताना ठसका लागला. उपचारासाठी तिला करबुडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी राजका शितप (वय ६५, रा. शितपवाडी – करबुडे, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला शितप यांना शनिवारी (ता. ११) रात्री भाकरी खाताना ठसका लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी गावातील डॉक्टरकडे नेले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.