( नवी दिल्ली )
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात आज (१४ फेब्रुवारी) रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राज्याच्यादृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आता हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का, याचे उत्तर मिळणार आहे. साहजिकच या एका गोष्टीवर केसच्या निकालाचे वेळापत्रकही अवलंबून असणार आहे. हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेले तर आणखी वेळ लागेल आणि सध्याच्या घटनापीठाकडे राहिले तर सलग सुनावणी होणार का, याची उत्सुकता असणार आहे.
एकीकडे निवडणूक आयोगाची सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे निकालाची. धनुष्यबाण नेमका कुणाला मिळणार याचं उत्तर राजकीयदृष्ट्या महत्वाचं असणार आहे. त्याचवेळी आता सुप्रीम कोर्टातली सत्तासंघर्षाची लढाई कुठल्या वळणावर जाते हे पाहण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक आहे.
कामकाजाच्या यादीत पहिल्याच क्रमाकांवर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण
सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत आज पहिल्याच क्रमांकावर हे प्रकरण आहे. या घटनापीठाकडे सध्या तीन विषय होते. त्यातल्या दिल्ली आणि केंद्र सरकारच्या अधिकारातल्या संघर्ष प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. तर एनआरसीचं प्रकरण नंतर ठेवलं आहे. त्यामुळे सध्या या घटनापीठाची प्राथमिकता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे.