(देवरूख / सुरेश सप्रे)
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अंत्रवली फाटा ते तुरळ या१३ किमी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पडलेल्या खड्यामुळे यावरून प्रवास करणे जिकरीचे व धोकादायक झाल्याने ८ गावातील नागरीकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. येथील जनतेचे प्रचंड हाल होत असलेने अपघात होवून जीवीत हानी टाळणेसाठी या रस्त्यावरील अंत्रवली, हेदवी, अणदेरी, तांबडी, चिखली, रांगव, तुरळ या गावातील ग्रामस्थांनी रस्यावर उतरत लढाई करणेचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
या रस्त्याचे काम आम. शेखर निकम यांनी महाविकास आघाडीच्या काळात २१-२२बजेटमधे मंजूर करून घेतले. त्याची टेंडर प्रक्रीया ही पुर्ण झाली तरी ही हे काम सुरू होत नसलेने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून दि. २४ फेब्रुवारी पर्यंत सदरचे काम सुरू न झालेस रस्तावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाची त्वरीत दखल घेत आम. निकम यांनी सा. बां. चे कार्यकारी अभियंता व उप अभियंता याचेसह ग्रामस्थ यांची बैठक देवरूख शासकीय विश्रामगृहात आयोजित करत समन्वय साधत काम सुरू करणेसाठी येणार्या तांत्रिक अडचणी व ग्रामस्थ यांची कैफियत समजून घेत तातडीने काम मार्गी लावणेसाठी अधिकारी ठेकेदार व ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांची गुरूवार दि. १६ रोजी रत्नागिरीत एकत्रितपणे बैठक घेवून काम त्वरीत सुरू करण्याची कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या आहेत. या बैठकीनंतर हि दि.२३रोजी पर्यंत काम सुरू न झालेस आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलन करणारच अशी ठाम भुमिका घेतली आहे. आमदार व प्रशासन यांना दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट केले आहे.
या बैठकीला सिद्धेश ब्रीद, सुरेश माईन, बंड्या महाडीक. सत्यवान विचारे, लियाकत नेवरेकर, चिन इंदूलकर, दिनेश मालप, अनिकेत सुर्वे, पपू सुर्वे, प्रशांत ब्रीद, अब्दूल हाजू, नरेश गोसावी, विश्वनाथ आयरे याचेसह जवळपास ५० ग्रामस्थ उपस्थित होते.