नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग हाच आशेचा किरण बनलेला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी आज सकाळी देशाला संबोधित केलं. आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने मोदी यांनी देशभरातील नागरिकांना संबोधित केलं.
योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही, असं मोदी म्हणाले.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढलं आहे.