टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो राहिला आहे. शोच्या 16 व्या सीझनला प्रेक्षकांचे फार प्रेम मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला हा शो अखेर संपुष्टात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतीक्षाही आता संपली आहे. शोच्या या सीझनच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे. या स्पर्धेचा विजेता एम सी स्टॅन ठरला आहे.
अनेकांना असे वाटत होते की, प्रियंका किंवा शिव या स्पर्धेत विजयी ठरतील. पण असं झालं नाही. एम सी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता झाला आणि त्या लखलखणाऱ्या ट्रॉफीवर त्याने आपले नाव कोरले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
एम. सी स्टॅनला 31 लाख 80 हजार इतकी प्राईझमनी मिळाली आहे. याशिवाय आलिशान हुंडाई गाडी बक्षीस म्हणून मिळाली आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला. बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनच्या चाहत्यांची भावना होती की, तो विजेतेपद मिळवेल आणि तसेच झाले. तो शेवटी बिग बॉस १६ चा विजेता ठरला.