( प्रतिनिधी / राजापूर )
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांना जाणीवपूर्वक गाडीने उडवून खून केला असल्याची कबुली संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने पोलिसांजवळ दिल़ी. दरम्यान पोलिसांकडून सुरूवातीला आंबेरकर याच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. मात्र पोलिसांचा तपास व आंबेरकरने दिलेला कबुलीजबाब यामुळे पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े.
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे हे 6 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 च्या सुमारास राजापूर पेट्रोलपंपातून आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडले होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर याने महिंद्रा थार गाडीने वारीशे याच्या ताब्यातील दुचाकीला धडक दिल़ी. या अपघातात वारीशे हे गंभीर जखमी झाल़े. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होत़े. त्या ठिकाणी खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना वारीशे यांचा मृत्यू झाला होत़ा. या प्रकरणी पत्रकार वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलिसात थार गाडीचा चालक आंबेरकर याच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती.
यानंतर पोलिसांनी आंबेरकर याच्याविरोधात भादंवि कलम 308 व 304 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. तसेच 7 फेब्रुवारी रोजी आंबेरकर याला न्यायालयात हजर केल्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या अपघाती मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. वारीशे यांचे नातेवाईक व रत्नागिरीतील पत्रकार यांनी आंबेरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होत़ी. पोलीस तपासात आंबेरकर याने जाणीवपूर्वक वारीशे यांच्या गाडीला धडक दिल्याचे समोर आल़े.
6 तारखेलाच वारिसे यांनी आंबेरकर याच्याविरूद्ध बातमी प्रसिद्ध केली होत़ी. याचाच राग मनात ठेवून आंबेरकर याने वारिसे यांचा काटा काढला असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला होत़ा. दरम्यान या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितल़े. मात्र आता राज्य शासनाकडून एसआयटी नेमण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आंबेरकरला जिल्हा रूग्णालयातून डिस्चार्ज
पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आंबेरकर याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होत़ी. पोलीस कोठडीत रवानगी होताच आंबेरकर याच्या छातीमध्ये कळा जाणवू लागल्य़ा त्यानुसार उपचारासाठी आंबेरकर याला जिल्हा शासकीय रूग्णालयात स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आले होत़े. दरम्यान आंबेरकर याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप रत्नागिरीतील पत्रकारांकडून करण्यात येत होत़ा. अखेर जिल्हा रूग्णालयाने आंबेरकर याच्या तपासण्या करून त्याला डिस्चार्ज दिल़ा